असेची करावे संस्कार होई सकल पिढीचा उद्धार असे विशाल वृक्ष माझी सावली घेतसे आकार आमच्या मार्गदर्शिका व मुख्याध्यापिका आ. कळंत्रे मॅडम आदरणीय पालक महोदय, सुजान वाचक हो , श्री जोतिर्लिंग संकुलाचे सर्व पालक, विद्यार्थी व शुभ चिंतक हो नमस्कार! जोतिर्लिंग पब्लिक स्कूल व विद्यानिकेतन माले या माझ्या शाळेमध्ये एक आदर्श विद्यार्थी घडावा या एकाच हेतूने आम्ही सदैव जागरूक असतो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे तसेच त्यांच्या व्यक्तिमत्व विकास घडवून त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास येथे घडवला जातो. विद्यार्थी कला, क्रीडा, विज्ञान, साहित्य या सर्व क्षेत्रात प्रगत व्हावा यासाठी शिक्षक अहोरात्र कष्ट घेत असतात याच शिवाय विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात नवीन आव्हानांना सामोरे जावे यासाठी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. यामध्ये स्पर्धा परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा ,इत्यादी परीक्षांद्वारे त्यांची तयारी करून घेतली जाते ,.याचबरोबर शारीरिक कार्यक्षमता वाढावी यासाठी प्राणायाम, योगासने ,विविध क्रीडा प्रकार घेतले जातात. यामध्ये बेसबॉल ,व्हॉलीबॉल ,क्रिकेट, कबड्डी, खो-खो ,स्केटिंग, फुटबॉल, कॅरम, बुद्धीबळ, कुस्ती , कुडो,कराटे, यासारखे खेळ घेतले जातात .शिवाय यासाठी तज्ञ प्रशिक्षक ही नियुक्त आहेत. शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुका व जिल्हास्तरीय पातळीवरच नव्हे तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ही मुलांनी मजल मारली आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासाबरोबरच त्यांच्यात सामाजिक बांधिलकी जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो. यासाठी पूर परिस्थिती असो दुष्काळग्रस्त भागातील पाणी फाउंडेशनचा उपक्रम असो व लोक न्यायालयाची जाणीव जागृती करणारे उपक्रम असो अशा अनेक उपक्रमांमध्ये आम्ही मुलांचाही सहभाग घेतो . अनेक परंपरा उत्सव जपण्याचा प्रयत्न सांस्कृतिक कार्यक्रमातून घेतो . दृढनिश्चय असेल तर अवघड कामेही मार्गी लागतात. या ओळीप्रमाणे कळंत्रे सरांच्या दृढनिश्चययामुळे प्रगतीचा आलेख चढता आहे. आमच्या या कार्यामध्ये, प्रगतीमध्ये वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन केल्याबद्दल सर्व पालक ,पदाधिकारी, सहकारी, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार. सौ. कळंत्रे एस. एस. मुख्याध्यापिका ( एम .ए. एम. एड)
To be integrated which excellent academics & technology. To be a meticulous to inculcate scientific awareness.
More info...
Hon. Mr. S.A. Kalantre is the Co- Founder and chairman of Panhalagad Education & Sports Complex who has been associated
More info...
To enable students capable to face tomorrows challenges. To reform social layers through dynamic education.
More info...