+91-7218971111 | 7038317111

img

Chairman’s Message

Chairman

अध्यक्षांचे मनोगत,

पूर्वेकडून उगवणारा सूर्य, पश्चिमेकडून छ. शिवाजी महाराज व शंभूराजांची आठवण करून देणारा पन्हाळा आणि उभ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान जोतिबा दक्षिणेला, उद्योगाची खाण वारणा उत्तरेला आणि या इतिहास, श्रद्धा, विज्ञान आणि उद्योगाच्या मध्यभागी असणारे ज्योतिर्लिंग पब्लिक स्कुल व विद्यानिकेतन, माले.
पन्हाळगड एजुकेशन सोसायटी अँड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या शिक्षण संस्थेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने २०१८ चा क्षितिज हा वार्षिक अंक आपल्या हाती देताना अद्वितीय आनंद आणि अभिमान आहे. लहानपणापासून समाजाविषयी काहीतरी करण्याची इच्छा होती, या शुद्ध मनाने सन २००९ साली संस्थेची स्थापना करून २०११ साली अवघ्या ८७ विद्यार्थ्यांसह शाळा सुरु केली, या शाळेच्या प्रगतीचे फलित म्हणजे यावर्षीची विद्यार्थी संख्या २५० वर जाऊन पोचोचली. आज या शाळेत मराठी माध्यम इंग्रजी माध्यम, सेमी माध्यम यामधून ज्ञानार्जनाचे काम करीत आहोत. सुसज्ज वसतिगृहातील शैक्षणिक खोल्या व प्रशस्त पटांगण एकावेळी जास्तीत जास्त विद्यार्थी प्रात्यक्षिक करू शकतील अशी मोठी संगणक प्रयोगशाळा, प्रशस्त भोजनगृह, स्वतंत्र बेड आणि कपाट या सर्व सोयींनीयुक्त वसतिगृहात सकाळी गरम शॉवरसहीत अंघोळीच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.
शाळेच्या प्रगतीच्या टप्प्यात आम्हाला रोटरी क्लबच्या ई-लर्निंग प्रोजेक्टरच्या माध्यमातून भर पडली. सकाळी प्रार्थनेला विविध विषयावर प्रश्नोत्तरे, जनरल नॉलेज, व्यक्तिविशेष ए. उपक्रमातून विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेचा पाय घातला जातो. तसेच दिवसाच्या ९ तासिकेनंतर ३ ते ४ तास स्वयम अभ्यासासाठी दिला जातो. माहितीची विपुलता भौतिक आणि तांत्रिक साधनांची उपलब्धता या सर्व घटकांमुळे सांप्रत युवापिढी निश्चितच विलक्षण बुद्धिमान आहे. या गतीला शिक्षणाची योग्य दिशा लाभावी आणि विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगिण ज्ञान विकास साधावा आणि राष्ट्राच्या जडण-घडणीत मोलाचे योगदान द्यावी हीच अभिलाषा.
याच तळमळीतून अनेक विद्यार्थी वक्तृत्व, चित्रकला, प्रश्नमंजुषा, स्पर्धा परीक्षेमधून एम. ती. एस. सचोलरशीप जी. ती. एस. यासारख्या परीक्षा शारीरिक विकासासाठी विद्यार्थ्यांचा व्यायाम योगासने घेऊन त्यांचे शरीर निरोगी ठेवण्यासाठी १००% प्रयत्न केला जातो विद्यार्थ्यांनाचा सर्वांगिण विकास तसेच सर्व विद्यार्थी शक्तिमान बनविण्यासाठी एकूण वर्षाचा आराखडा तयार केला जातो.
या शाळेतील विद्यार्थ्यांनी अल्पावधीतच कर्तृत्वाच्या जोरावर शालेय स्तरावर खेळ खेळून महाराष्ट्रभर नाव कमाविले आहे. त्यामुळे ४०० मीटर ट्रॅक असलेले मोठे क्रीडांगण तयार करण्याचे काम सध्या सुरु आहे. यासोबतच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट एडुकेशन मार्फत लाईव्ह एक्झामिनेशन सारख्या परीक्षा राबवल्या जातात.
गुणात्मक प्रगतीबरोबरच इतर स्पर्धा वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, अभिनय, कला कौशल्य, संगीतनृत्य, खेळ यामध्येही अनेक विद्यार्थी पारंगत असल्याचे दिसून येते. इतकेच नाही तर सामाजिक प्रेरणेसाठी ग्रंथदिंडी, स्वछता अभियान, रॅली ई. उपक्रमातही विद्यार्थी सहभागी होतात. स्वछ भारत विषयावर पथनाट्यांचे आयोजन केले जाते. शब्दांचा भडीमार न करता कृतीतून विद्यार्थ्यांच्या मंदिर विचार बिंबवले जातात. उदा. वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, जोतिबा डोंगर स्वछता, वृद्धांना मदत, स्त्रीभ्रूण हत्या यासारख्या विषयांवर प्रबोधन करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. तसेच अनेक महान व्यक्तींच्या जयंती -स्मृतिदिन यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात कृतज्ञता व्यक्त केली जाते.
विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधणे व एक उत्तम नागरिक घडविणे हे शाळेचे उद्दिष्ट्य आहे. पुन्हा एकदा सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो व आशीर्वादाचे हात या संस्कार केंद्रावर असेच राहावेत ही अपेक्षा व्यक्त करतो.

श्री. शिवलिंग अनंत कळंत्रे
संस्थापक अध्यक्ष
(एम. ए. बी पी एड)
अध्यक्ष- पन्हाळ गड एज्युकेशन अँड स्पोर्टस कॉम्प्लेक्स माले
अध्यक्ष-कोल्हापूर जिल्हा कुडो असोसिएशन, कोल्हापूर
अध्यक्ष-पश्चिम महाराष्ट्र इंग्रजी माध्यम स्कूल प्रेसिडेंट ऑफ असोसिएशन

यांच्या विषयी थोडेसे
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या माले ,या गावी एक आदर्श विद्यार्थी घडविण्याच्या उद्देशाने हे शैक्षणिक संकुल त्यांनी उभे केले.
जून 2011 साली निसर्गरम्य, प्रदूषणमुक्त ,आरोग्यदायी अशा जोतिर्लिंग च्या पायथ्याला जोतिर्लिंग पब्लिक स्कूल व विद्यानिकेतन माले चा प्रारंभ केला,. त्यामागे उद्देश केवळ एकच या शिक्षण समुहातून एक सर्वगुणसंपन्न, संस्कारशील, आदर्श व्यक्तिमत्त्वाचा विद्यार्थी येथे घडला पाहिजे, यासाठी सर नेहमी कार्यरत राहिले .
यासाठी शाळेमध्ये सदैव अनेक उपक्रम राबविले जातात . विद्यार्थ्यांचे मन, मनगट व मस्तिष्क बळकट असेल तर तो या स्पर्धेच्या युगात टिकू शकतो. यासाठी विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ( कुडो ,फुटबॉल, कबड्डी ,थांगता, व्हॉलीबॉल, क्रिकेट, कॅरम, बुद्धिबळ) ,व या खेळांसाठी प्रशिक्षित तज्ञांची नेमणूक केली.
याचे फलित म्हणून शाळेतील विद्यार्थी केवळ तालुका व राज्य पातळीवरच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरही चमकले. उज्वल यश संपादित केले .कुमारी नम्रता शिंदे हिने राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून शाळेच्या इतिहासात सोन्याचा तुरा रोवला. शाळेतील विद्यार्थी केवळ क्रीडा स्पर्धेत नव्हे तर बौद्धिक क्षेत्रात ही चमकावे त्यासाठी अनुभवी व उच्चशिक्षित तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती केली .याद्वारे अनेक उपक्रम राबवले .
सर केवळ इतकेच करून थांबले नाही तर सदैव अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी राहिले. त्यामध्ये पूर परिस्थिती असो वा दुष्काळग्रस्त भाग असो दोन्ही स्थितीमध्ये मदतीचा हात सदैव पुढे केला.
शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपतांना गोंदवले खुर्द येथील पाणी फाउंडेशनचा उपक्रम असो कोल्हापूर येथील अनेक पूरग्रस्तांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप असो तसेच जोतिबा यात्रा वेळी भाविकांसाठी अनेक सेवा पुरवणारे उपक्रम असो किंवा लोक न्यायालयासाठी जाणीव जागृती करणारे पथनाट्य असो अशा एक नाही अनेक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला .यासाठी ते अनेक सत्कार व सन्मानाने पुरस्कृत ही झाले. त्याच बरोबर कुडो या खेळांमध्ये राष्ट्रीय पंच म्हणून नियुक्त झाले आहेत.
अशा या हरहुन्नरी व कर्तृत्वशील शील संस्थापक अध्यक्ष नेतृत्वावर अनेक जिल्ह्यातील सहस्त्र पालकांनी विश्वास दर्शविला व त्याला पात्र ठरले .त्याच पद्धतीने त्यांच्या वाटचालीत सर्व संचालकांचे मोलाचे योगदान लाभले.
कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज असते त्या जोरावर तो कोणतेही ध्येय साध्य करू शकतो याची प्रचिती त्यांच्याद्वारे येते.
त्यांच्या विषयी थोडक्यात इतकेच म्हणावेसे वाटते-
उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी
नजरेत सदा नवी दिशा असावी घरटे काय केव्हाही बांधता येईल पण क्षितिजाकडे झेप घेण्याची जिद्द मनी असावी.

English

Our Vision

To be integrated which excellent academics & technology. To be a meticulous to inculcate scientific awareness.
More info...

Chairman's Message

Hon. Mr. S.A. Kalantre is the Co- Founder and chairman of Panhalagad Education & Sports Complex who has been associated
More info...

Our Mission

To enable students capable to face tomorrows challenges. To reform social layers through dynamic education.
More info...