या शाळेतील विद्यार्थ्यांनी अल्पावधीतच कर्तृत्वाच्या जोरावर शालेय स्तरावर खेळ खेळून महाराष्ट्रभर नाव कमाविले आहे. त्यामुळे ४०० मीटर ट्रॅक असलेले मोठे क्रीडांगण तयार करण्याचे काम सध्या सुरु आहे. यासोबतच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट एडुकेशन मार्फत लाईव्ह एक्झामिनेशन सारख्या परीक्षा राबवल्या जातात.
गुणात्मक प्रगतीबरोबरच इतर स्पर्धा वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, अभिनय, कला कौशल्य, संगीतनृत्य, खेळ यामध्येही अनेक विद्यार्थी पारंगत असल्याचे दिसून येते. इतकेच नाही तर सामाजिक प्रेरणेसाठी ग्रंथदिंडी, स्वछता अभियान, रॅली ई. उपक्रमातही विद्यार्थी सहभागी होतात. स्वछ भारत विषयावर पथनाट्यांचे आयोजन केले जाते. शब्दांचा भडीमार न करता कृतीतून विद्यार्थ्यांच्या मंदिर विचार बिंबवले जातात. उदा. वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, जोतिबा डोंगर स्वछता, वृद्धांना मदत, स्त्रीभ्रूण हत्या यासारख्या विषयांवर प्रबोधन करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. तसेच अनेक महान व्यक्तींच्या जयंती -स्मृतिदिन यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात कृतज्ञता व्यक्त केली जाते.
विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधणे व एक उत्तम नागरिक घडविणे हे शाळेचे उद्दिष्ट्य आहे. पुन्हा एकदा सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो व आशीर्वादाचे हात या संस्कार केंद्रावर असेच राहावेत ही अपेक्षा व्यक्त करतो.
भक्तिरसाचा अखंड झरा कुलदैवत जोतिबाच्या पायथ्याशी असणारे नवीन तंत्रज्ञानाशी नाते सांगणारे अग्रेसर शैक्षणिक दालन.
सुसज्ज इमारत, निसर्गरम्य वातावरण.
सर्व सोयींनीयुक्त आदर्श वसतिगृह.
बसची सुविधा व माफक फी.
घरगुती भोजनाची चव सांगणारे सकस आहारानेयुक्त परिपूर्ण भोजन देणारे भव्य भोजनगृह.
तंत्रद्रुष्टीस बळ देणारी सुसज्ज व सर्व सोयींनीयुक्त प्रयोगशाळा.
विद्यार्थ्यांची बौद्धिक ज्ञानकक्षा रुंदावणारे आदर्श ग्रंथालय .
खेळाने मन, व शरीर सुदृढ बनते हे जाणून चार एकरांचे भव्य क्रीडांगण.
भारतीय संगीताची शास्त्रशुद्ध ओळख करून देणारे स्वरमयी संगीत दालन.
उच्चशिक्षित, अनुभवी व तज्ञ शिक्षकवृंद तसेच सेवातत्पर शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग.
सर्व सोयींनीयुक्त भव्य अशा पंधरा एकरातील सुसज्ज व परिपूर्ण शैक्षणिक दालन व क्रीडा संकुल.
विद्यार्थ्यांच्या अंगच्या गुणांचा विकास करणे.
विद्यार्थ्यांच्या अंगी तांत्रिक दृष्टिकोनाचा विकास करणे.
विद्यार्थ्यांना ज्ञानमार्गी बनवणे.
पारंपरिक ज्ञानाबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचे परिपूर्ण शिक्षण देणे.
निसर्गाशी जवळीकता व निसर्गरक्षणाचे शिक्षण देणे.
विद्यार्थ्यांमध्ये उच्च शैक्षणिक पात्रता निर्माण करणे.
उत्कृष्ठ राष्ट्र निर्मिती हे ध्येय नजरेसमोर ठेऊन शिक्षण देणे.
To be integrated which excellent academics & technology. To be a meticulous to inculcate scientific awareness.
More info...
Hon. Mr. S.A. Kalantre is the Co- Founder and chairman of Panhalagad Education & Sports Complex who has been associated
More info...
To enable students capable to face tomorrows challenges. To reform social layers through dynamic education.
More info...